नागरिकांनी रानभाजी महोत्सवात सहभागी व्हावे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:46+5:302021-08-12T04:37:46+5:30
बीड : जिल्हाभरात कृषी विभागाच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. ११ ...

नागरिकांनी रानभाजी महोत्सवात सहभागी व्हावे - A
बीड : जिल्हाभरात कृषी विभागाच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. ११ ऑगस्ट रोजी बीड येथील समाजकल्याण भवन येथे महोत्सव होणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड येथील समाजकल्याण भवन कृषी विभाग येथे रानभाजी महोत्सव होणार आहे. यावेळी फळांची वैशिष्ट्ये, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. साईराम महिला बचत गटाच्या वतीने कार्यक्रमस्थळी रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गंडे यांनी केले आहे.