आठवडी बाजार बंदमुळे नागरीकांचे हाल, उलाढालीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:54+5:302021-03-10T04:33:54+5:30
धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे ...

आठवडी बाजार बंदमुळे नागरीकांचे हाल, उलाढालीला ब्रेक
धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे हे अर्थचक्र थांबल्याने अनेकांच्या उपजीविकेसोबतच कितीतरी प्रश्न उभे राहिले आहेत. अंबेवडगाव येथील आठवडी बाजाराच्या दिवशी नागरीक प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
जनावरांच्या आठवडी बाजाराने जिल्हाभर ओळख दिली, लहान वस्तू पासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याचे आठवडी बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे मात्र वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाच्या कारणामुळे बाजार बंद झाले. आंबेवडगाव बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती. शिवाय यावर अनेकांची उपजीविका तसेच शेतातील माल विकण्याचा सोपा पर्याय होता. भाजीपाला ,अन्नधान्य विकायचे आणि याच पैशातून दैनंदिन बाजारहाट ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आंबेवडगावचा बाजार मंगळवारी थांबला. सर्वत्र शुकशुकाट होता. कारखाने परत आल्याने बाजार फुलणार असतानाच ते बंद झाल्याने यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. कारण वर्षभरापासून या संकटाने व्यवसाय कोलमडले होते आता कुठे स्थिरस्थावर होत असताना पुन्हा एकदा संकट उभे राहिल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले. खरेदी-विक्री करण्यासाठी सोपी बाजारपेठ असलेले आठवडी बाजार अनेकांना उपजीविका देणारे असल्याने ते पूर्ववत बंधने घालून सुरू करावीत अशी मागणी होत आहे.
आठवडी बाजारात शेतातील माल विकून त्यानंतर लागण्याऱ्या वस्तू खरेदी करणे शक्य असायचे बाजार बंद असल्याने विकायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पैसे हाती येणार नाहीत. त्यामुळे खरेदी करताना हात आखडता राहील.
- बालाजी नायकोडे शेतकरी,
वर्षभरापासून व्यवसायात मोठे नुकसान झाले आता कुठे परिस्थिती सुरळीत होत आहे असे वाटतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद केल्याने मोठी अडचण होणार आहे. कारखाने परतल्याने ग्राहक या काळात वाढतात नेमके याच वेळी बाजार बंद झाल्याने नुकसान होणार आहे. एक बैल जोडी एक लाखाला विकत होती .
- बाबाआप्पा घोळवे , व्यापारी ,
आंबेवडगाव
===Photopath===
090321\img-20210309-wa0106_14.jpg
===Caption===
धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील आठवडी बाजार मंदमुळे ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक लागले आहे.