शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:28 IST

आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य नागरिकांना मिळावे, यासाठी शासनाने वाढीव धान्य कोटा देण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण तर झालीच नाही. आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख कुटुंब स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु, दुकानदारांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रत्येक महिन्याला फक्त तीन ते साडेतीन लाख कुटुंबांनाच स्वस्त धान्याचा लाभ दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागिराकांना आर्थिक परिस्थिती नसताना देखील खूल्या बाजारातून महाग धान्य खरेदी करावे लागत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमिवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व सरसकट स्वस्त धान्य देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनस्तरावर ही मागणी गांभीर्याने घेतली गेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून आलेले धान्य देखील लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवले जात नसल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहितीनोहेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक कुटंबांना रेशन मिळत नसल्याचा मुद्दा आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली मात्र, ई-पॉसचे कारण पुढे करत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेली. वास्तविक ई-पॉज प्रणालीमुळे लाभार्थ्यांना धान्य नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना यावेळी खोटी माहिती देण्यात आली होती.

टॅग्स :droughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र