विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:59 IST2019-01-22T23:59:03+5:302019-01-22T23:59:42+5:30
जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध
बीड : जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.
बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर ,मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर,पिठासीन अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीत स्वच्छता सभापतीपदी काकू नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर तर बांधकाम सभापतीपदी बीड शहर विकास आघाडीचे सय्यद सादेक अली , महिला व बालकल्याण सभापतीपदी पुजा गणेश वाघमारे, शिक्षण सभापती पदी सय्यद इलीयास हमीद यांची निवड झाली. एमआयएमच्या शेख सुलताना बेगम शेख चांद यांची पाणी पुरवठा तर नियोजन सभापतीपदी बिसमिल्लाबी पाशामियां यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी शहर विकास आघाडीच्या पिंगळे सुभद्रा बाजीराव यांची वर्णी लागली. स्थायी समितीवर शहर विकास आघाडीचे भास्कर जाधव, एमआयएमचे शेख मोहम्मद खालेद, काकू नाना आघाडीचे अमर नाईकवाडे यांची निवड झाली.
दरम्यान, एमआयमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी ‘व्हीप’ जारी करुन तटस्थ राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय डावपेचात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची खेळी यशस्वी ठरली. एमआयएमला २ सभापतीपद देत शहर विकास आघाडीकडे ४ सभापती पदे राखण्यात यश आले.