शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:17 IST

रिक्षात आधीच बसले होते गुंड, बसस्थानकाऐवजी नेलं निर्मनुष्य स्थळी; १८ वर्षांच्या तरुणाला लुटलं, थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : प्रवासी तरुणाला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण करुन रिक्षाचालकाने लुटले. ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात त्याच्याकडील पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून ढकलून देत तो पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी २ मार्च रोजी रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या दोन गुंड साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील गेवराईचा असलेला ओम संजय राठोड (१८) हा २८ फेब्रुवारी रोजी रामनगरमध्ये राहणाऱ्या मामाला भेटण्यासाठी शहरात आला होता. दिवसभर त्याला भेटून रात्री तो गेवराईला जाण्यासाठी निघाला. सिडको बसस्थानकावर जाण्यासाठी तो रामनगर विठ्ठलनगर रिक्षा थांब्यावर येऊन थांबला. समोर आलेल्या रिक्षात तो बसला. त्याच्या आधीच रिक्षाचालकाचे गुंड साथीदार प्रवासी म्हणून रिक्षात बसलेले होते. चालकाने रिक्षा बसस्थानकाऐवजी अचानक सुसाट वेगात धूत रुग्णालयाच्या दिशेने वळवून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत नेली. ओम याला मारहाण करून धमकावले. अजिंठा फार्मा कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य परिसरातील मार्गावर नेत त्याच्या मोबाईलमधील डिजिटल वॉलेटमधून ऑनलाईन ३६० रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर खिशातील २ हजार रुपये व मोबाईल हिसकावून रिक्षातून ढकलून देत पसार झाले. मुकुंदवाडी पोलिस तपास करत आहेत.

प्रवाशांची सुरक्षा व रिक्षाचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरसर्वसामान्य व प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक गुंंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हेगारांनी प्रवेश केला. त्यातून अनेकदा प्रवाशांची लुटमार, प्राणघातक हल्ले, शिवीगाळ, महिला, तरुणींसोबत गैरप्रकाराच्या घटना शहरात घडल्या. अशाच गुन्हेगार रिक्षाचालकांनी थेट पोलिसांवरच प्राणघातक हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, तरीही गुन्हेगार रिक्षाचालकांमुळे नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात