चंद्रकांत खैरे, भुमरे आज बीड, केजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:10+5:302021-01-13T05:27:10+5:30
बीड : शिवसेना संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील होत असलेल्या ...

चंद्रकांत खैरे, भुमरे आज बीड, केजमध्ये
बीड : शिवसेना संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकसंदर्भात केज येथील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये १२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीस परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी येथील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी सेना, आजी-माजी लोकप्रतिनिधी, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख ज्या गावातील निवडणूक आहे तेथील उमेदवारांचे प्रतिनिधी, वाॅर्डनिहाय शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी कळविले आहे.
बीड येथेही बैठक
ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात १२ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या संदर्भात बैठक होणार आहे. निवडणुकीचा आढावा घेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे शिवसेना संपर्कनेते खैरे यांनी लोकमतशी चर्चा करताना सांगितले. शिवसेनेचे औरंगाबाद शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी हे देखील या दौऱ्यात खैरे यांच्यासोबत आहेत.