नित्रुडमध्ये किसान सभेचे चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:37+5:302021-02-07T04:31:37+5:30
प्रमुख मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी मुळाटे यांना देण्यात आले. आंदोलनात माकपचे तालुका सचिव कॉ.मुसद्दिकबाबा ,कॉ. संदीपान तेलगड,कॉ. ...

नित्रुडमध्ये किसान सभेचे चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
प्रमुख मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी मुळाटे यांना देण्यात आले. आंदोलनात माकपचे तालुका सचिव कॉ.मुसद्दिकबाबा ,कॉ. संदीपान तेलगड,कॉ. सुभाष डाके शेतमजूर युनियनचे कॉ. सय्यद रज्जाक,जनक तेलगड, सुखदेव घुले, लिंम्बा पवार, रामभाऊ राऊत, दत्ता आवाड, बालासाहेब गवळी, दत्ता घुले, नितीन पवार,पोपट गायकवाड, पांडुरंग उबाळे, माणिक काळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
-------
या मागण्यांसाठी आंदोलन
शेतकरीविरोधी नवीन कृषी कायदे रद्द करा, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान तात्काळ वाटप करा, सन २०२० खरीप हंगामातील पीकविमा मंजूर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.