सीईओंचा ग्रामीण दौरा, विनाकारण फिरणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST2021-05-23T04:34:01+5:302021-05-23T04:34:01+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले होते. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात जास्त रुग्ण सापडत आहेत. ...

सीईओंचा ग्रामीण दौरा, विनाकारण फिरणाऱ्यांना दंड
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले होते. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात जास्त रुग्ण सापडत आहेत. लोक काळजी न घेता बाहेर फिरत आहेत. याच आनुषंगाने पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा, सावरगाव, सोनेगाव, थेरला, नायगाव, लिंबादेवी या गावांना शनिवारी दुपारी अजित कुंभार यांनी अचानक भेटी दिली. गावात विनाकारण घराबाहेर पडलेल्या, गर्दी करणाऱ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या काही लोकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. तसेच नायगावमध्ये लॉकडाऊन असतानाही हॉटेल उघडे दिसले. कुंभार यांनी अचानक भेट देत या हॉटेलचालकाला दोन हजार रुपयांचा दंड आकारला. सोबत पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर.तांदळे हेदेखील होते.
===Photopath===
220521\22_2_bed_26_22052021_14.jpeg
===Caption===
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील माहिती घेताना सीईओ अजित कुंभार. सोबत डॉ.एल.आर.तांदळे.