शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:20 IST

आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल

- पुरुषोत्तम करावा माजलगाव ( बीड) : येथील भाजप कार्यकर्ते तथा रमेश आडसकर यांचे विश्वासू अशोक शेजुळ यांच्यावर भरदिवसा सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर येथे अडवून रॉडने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शेजुळ यांच्या फिर्यादीवरून माजलगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशोक शेजुळ हे दररोज प्रमाणे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी आले होते. त्या ठिकाणाहून घरी परत जात असताना शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी अडवले. त्या ठिकाणी अचानक त्यांनी रॉडने अशोक शेजुळ यांच्यावर वार करू लागले, यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता त्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक रुग्णालयात पुढील उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले होते. यात शेजुळ हे अत्यंत गंभीर जखमी झाले होते. यात त्यांच्या डाव्या पायाला तीन फ्रॅक्चर, उजव्या पायाला एक फ्रॅक्चर तर दोन्ही हात ही फ्रॅक्चर असून डोक्याला ही जबर मार आहे. 

याप्रकरणी त्यांनी दिलेल्या यादीवरून आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPrakash Solankeप्रकाश सोळंके