नीलेश राणे यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:55 IST2020-10-12T14:49:24+5:302020-10-12T14:55:24+5:30

FIR against Nilesh Rane in Beed district सोशल मीडियात पोस्ट प्रकरणी नितेश राणे आणि इतर दोघांवर गुन्हा

A case has been registered against Nilesh Rane in Beed district | नीलेश राणे यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

नीलेश राणे यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियात

केज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर द्वेषभावना पसरविणारा संदेश टाकल्याबद्दल कोकणातील भाजपचे नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह दोघांवर विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियात टाकल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी पोलिसात ९ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन केज पोलिसांनी नीलेश राणे, विवेक आंबाड (रा. लाडेगाव, ता. केज) आणि रोहन चव्हाण (रा. पळसखेडा, ता. केज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धे करीत आहेत.

Web Title: A case has been registered against Nilesh Rane in Beed district