कार दुभाजकाला धडकली, शिव अंगणवाडी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षासह अन्य एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 12:02 PM2021-09-25T12:02:30+5:302021-09-25T12:02:58+5:30

Accident in Beed : धुळे-सोलापूर महामार्गावरील बाह्यवळण चौकालगतच्या पुलावर कारचा ताबा सुटला

The car hit the divider, killing two, including the Marathwada president of the Shiv Anganwadi Sena | कार दुभाजकाला धडकली, शिव अंगणवाडी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षासह अन्य एक ठार

कार दुभाजकाला धडकली, शिव अंगणवाडी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षासह अन्य एक ठार

Next

बीड: भरधाव कार दुभाजकाला धडकून दोघे जागीच ठार झाले तर एक जखमी आहे. धुळे-साेलापूर महामार्गाच्या बाह्यवळणावरील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली. शिव अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप ज्ञानदेव भोसले (५०, रा. संत कबीरनगर, बीड) यांच्यासह महेंद्र सीताराम गायकवाड (४०,रा.बार्शी नाका, बीड) यांचा मृतांत समावेश आहे. 

पोलीस सूत्रांनुसार, दिलीप भोसले यांच्या सासूवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २४ सप्टेंबर रोजी त्यांना भेटून रात्री उशिरा भोसले हे कारमधून (एमएच २२ -५२७७) बीडकडे केजमार्गे परतत होते. त्यांच्यासोबत महेंद्र गायकवाड यांच्यासाह चंद्रकांत कांबळे (रा.लक्ष्मणनगर, बीड) हे होते. दरम्यान, धुळे-सोलापूर महामार्गावरील बाह्यवळण चौकालगतच्या पुलावर कार आली तेव्हा दिलीप भोसले यांचा ताबा सुटला, त्यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली. यात दिलीप भोसले व महेंद्र गायकवाड हे जागीच ठार झाले तर चंद्रकांत कांबळे हे जखमी आहेत. तिघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन दोघांना मयत घोषित केले.

Web Title: The car hit the divider, killing two, including the Marathwada president of the Shiv Anganwadi Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app