भरधाव कार- दुचाकीची समोरासमोर धडक; सैनिकासह अन्य एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 21:36 IST2021-09-23T21:34:07+5:302021-09-23T21:36:07+5:30

सायंकाळी सात वाजता ही घटना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर घडली.

Car-bike head-on collision; One person, including a soldier, was killed in the accident | भरधाव कार- दुचाकीची समोरासमोर धडक; सैनिकासह अन्य एक ठार

भरधाव कार- दुचाकीची समोरासमोर धडक; सैनिकासह अन्य एक ठार

बीड : भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुटीवर आलेल्या सैनिकासह अन्य एक जागीच ठार झाला. गुरुवारी सायंकाळी सात वाजता ही घटना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर घडली. उमेश अभिमान सिरसाट (३७), विष्णू शंकर काटे (४५, दोघे रा. खंडाळा ता. बीड) अशी मृतांची नावे आहेत.

उमेश सिरसाट है सैन्यदलात बेळगाव, कर्नाटक येथे कार्यरत असून सुटीवर गावी आले होते. २३ सप्टेंबर रोजी उमेश सिरसाट व विष्णू काटे हे दोघे दुचाकीवरून (एमएच एमएच १४ बीई-९५४२) खंडाळ्याकडे जात होते; तर कार (एमएच १३ सीएस-८०६९) मांजरसुंब्याहून नेकनूरकडे जात होती. एका ढाब्यासमोर कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

यात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचा चक्काचूर झाला; तसेच रस्त्यावर रक्तामांसाचा सडा पडला होता. घटनास्थळी महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक सुरेश गित्ते तसेच नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा व सहकाऱ्यांनी भेट दिली. मृतदेह नेकनूर कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघातानंतर कारमधून धूर
अपघातावेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील लोक धावून आले. कारमधून धूर येत होता. आत चौघे अडकले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून पाणी टाकून आग विझविला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Car-bike head-on collision; One person, including a soldier, was killed in the accident