भीषण आगीत कापसाच्या गाठी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST2021-03-04T05:02:46+5:302021-03-04T05:02:46+5:30

बीड : तालुक्यातील जप्ती पारगावजवळ असलेल्या एका वेअर हाऊसला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत शासनाने व काही खासगी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या ...

Burn cotton bales in a fierce fire | भीषण आगीत कापसाच्या गाठी जळून खाक

भीषण आगीत कापसाच्या गाठी जळून खाक

बीड : तालुक्यातील जप्ती पारगावजवळ असलेल्या एका वेअर हाऊसला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत शासनाने व काही खासगी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळाल्या असून त्यात जवळपास ५० ते ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वेअर हाऊसचालकांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना १ मार्च २१ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान घडली.

ही आग विझविण्यासाठी १२ ते १५ अग्निशमन दलाच्या गाड्या मध्यरात्रीपासून कार्यरत आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात गाठी असल्यामुळे आग आटोक्यात आलेली नाही. वेअर हाऊसमध्ये वीज नसते. त्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आग लागली का लावली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

बीडपासून काही अंतरावर असलेल्या जप्ती पारगाव येते खिंवसरा, नहार, कोटेचा, बागमार या चौघांचे ‌वेअर हाऊस आहे. हे गोदाम बुलढाणा अर्बण बँकेने भाड्याने घेतले होते. त्यामध्ये पणन महासंघाच्या २१ हजार १५० व खासगी व्यापारी व जिनिंग यांच्या ५ हजार ५१ अशा मिळून २६ हजार २०१ कापसाच्या गाठी गोदामात ठेवलेल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री भीषण आगीत सर्व काही खाक झाले. बुलढाणा अर्बन बँकेसोबत पणन महासंघाचा करार झालेला आहे. याच बँकेचे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे देखील काही महिन्यांपूर्वी धान्याचे गोदाम जळून खाक झाले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आग आटोक्यात आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

===Photopath===

020321\022_bed_23_02032021_14.jpeg

===Caption===

पाहटेच्या वेळी आगीचे भिषण रूप 

Web Title: Burn cotton bales in a fierce fire