बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:45+5:302021-03-10T04:33:45+5:30
मेडिकल कॉलेज मार्गावर पथदिवे लावा अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते मेडिकल कॉलेज या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवावेत. हा ...

बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून
मेडिकल कॉलेज मार्गावर पथदिवे लावा
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते मेडिकल कॉलेज या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवावेत. हा मुख्य रस्ता रुग्णालयाकडे जाणारा असल्याने रात्रीच्या वेळीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अंधारामुळे गैरप्रकार उद्भवू शकतात. यामुळे मात्र नागरिकांना त्रास होऊ शकतो. यामुळे नगर परिषदेने या मार्गावर पथदिव बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी
बीड : शहरातील पांगरी रोड, पिंपरगव्हाण रोड या भागात मागील आठवड्यापासून सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पालिकेने किमान दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा, म्हणजे पाण्यासाठी भटकंती होणार नाही. अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या- जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. याबाबत गांभीर्याने घेऊन रस्त्यासाठी पर्याय तयार करावा, अशी मागणी होत आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन चोऱ्यांचे शोध लावावेत, अशी मागणी केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.