शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावाचा संशयास्पद मृत्यू; बहिणीचा थेट सुप्रीम कोर्टात लढा, अखेर चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 18:51 IST

चार वर्षानंतर बहिणीच्या लढ्याला यश; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश

- मधुकर सिरसटकेज: भावाच्या संशयास्पद मृत्यूनंतर चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा लढा एका बहिणीने थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला. अखेर चार वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने चारही जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

केज तालुक्यातील बनकरंजा येथील शिवाजी मारुती बांगर यांचा दि.3 एप्रिल 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दि. 5 एप्रिल 2020 रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, हा मृत्यू दुचाकीवरून पडून झाला नसून मारहाण केल्यामुळे झाल्याचा संशय शिवाजी बांगर यांची बहीण सिंधु जनक नागरगोजे यांनी व्यक्त केली होती.

सिंधु यांची काय आहे तक्रारदि. 2 एप्रिल 2020 रोजी दत्ता रामचंद्र मैंद यांनी शिवाजी यास ऊसतोड टोळीचा हिशोब करण्यासाठी चिंचपूरच्या दिशेने घेऊन गेले होते. येथे मारहाण करुन जखमी अवस्थेत प्रथम धारूरला त्यानंतर अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, दुसऱ्या दिवशी दि.3 एप्रिल 2020 रोजी दुपारी शिवाजी बांगर यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब), दिलीप बाबासाहेब नागरगोजे (लांब), बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे (लांब) सर्व रा. बनकरांजा आणि दत्ता रामचंद्र मैद यांनी खून केला असल्याची तक्रार सिंधु नागरगोजे यांनी केली होती.

असा दिला बहिणीने लढाया प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सिंधु नागरगोजे यांनी याचिका दाखल करुन याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.परंतु न्यायाधिशांनी या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक झोटे यांना तपास करून खंडपीठाला तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी आरोपिंना अभय देत खंडपीठाला अहवाल सादर केला होता. त्यामुळे सिंधु नागरगोजे यांनी सर्वोच्च न्यायालयात २१ नोव्हेंबर २०२० धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनंतर न्यायमुर्ती बेला. एम. त्रिवेदी व दिपानकर दत्ता यांनी या प्रकरणात चार जणांवर विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तब्बल चार वर्षानंतर दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधू नागरगोजे यांच्या तक्रारी वरून मयत भाऊ शिवाजी बांगर याच्या मृत्यू प्रकरणी बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब), दिलीप बाबासाहेब नागरगोजे (लांब), बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे (लांब) सर्व रा. बनकरांजा आणि दत्ता रामचंद्र मैद रा. मैंदवाडी ता. धारूर या चौघा विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करित आहेत. फिर्यादी सिंधु नागरगोजे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात ॲड. मल्हारी अदाटे व ॲड. अमेय सबणीस यांनी बाजू मांडली. तर सर्वोच्च न्यायालयात ॲड सुधांश्यू चौधरी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड