Brother beat up by relatives;strike in Beed civil hospital | रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

बीड : जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत ब्रदरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

आमेर शेख (वय ३०, रा. बीड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री ८ वाजता अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत कर्तव्यावर असलेल्या रतन बडे या ब्रदरला मारहाण केली. टेबल फेकून देत कागदपत्रेही फाडली. ही घटना समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालय गाठले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. उप अधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणाव होता.

दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर सर्व परिचारिका व कर्मचारी, डॉक्टर एकत्रित आले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित कामबंद आंदोलन पुकारत कडक कारवाईची मागणी केली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. बाबासाहेब ढाकणे, परिचारिका संगीता  दिंडकर, शीला मुंडे, संगीता सिरसाट, स्वाती माळी, संगीता क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, सेवक यांची उपस्थिती होती.

रुग्णायाला कडेकोट बंदोबस्त
मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप होते. रात्री उशिरापर्यंत हा तणाव कायम होता.

पोलिसांसमोरच मारहाण झाल्याने संताप
मयत हा निवृत्त पोलीस कर्मचाºयाचा मुलगा असल्याचे समजते. त्यांचा अपघात होताच पोलीस बॉईज व कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केली. यावेळी जवळपास १० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

काय आहे नातेवाईकांचा आरोप ?
आमेर शेख यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा ते जिवंत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर काही वेळांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गोंधळ कायम होता.

रुग्णालयातील प्रकाराबद्दल माहिती समजताच आलो. डॉक्टर, कर्मचाºयांची चूक असेल तर खात्यांतर्गत चौकशी करुन कारवाई केली जाईल. कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलन करु नये म्हणून त्यांना विनंती केली जात आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून डॉक्टर, सीएचओंना वॉर्डमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक


Web Title: Brother beat up by relatives;strike in Beed civil hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.