परळीत किराणा दुकान फोडले; ४५ हजार रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:14+5:302021-07-21T04:23:14+5:30
उड्डाण पुलालगत परळी-गंगाखेड रस्त्यावर गजानन गंगाधर चिद्रवार यांचे किराणा मालाची सुपर शाॅपी आहे. १८ रोजी दुपारी चार वाजता ...

परळीत किराणा दुकान फोडले; ४५ हजार रुपये लांबविले
उड्डाण पुलालगत परळी-गंगाखेड रस्त्यावर गजानन गंगाधर चिद्रवार यांचे किराणा मालाची सुपर शाॅपी आहे. १८ रोजी दुपारी चार वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान कुलूप लावून बंद केले. दुकान बंद करत असताना गल्ल्यात ४५ हजार रुपये रोकड व उधारीच्या नावे असलेल्या चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. १९ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान उघडण्यास गेले असता कुलूप तोडलेले आढळले. दुकानात गेले असता गल्ल्यातील ४५ हजाराची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून, एक अनोळखी मुलगा दुकानात शिरल्याचे यामध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी चिद्रवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संभाजीनगर पोलीस जमादार रंगनाथ राठोड हे करीत आहेत. आरोपीचा कसून शोध घेत आहे