लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST2021-03-04T05:02:39+5:302021-03-04T05:02:39+5:30
आष्टी : जमीन नावे करणे आणि अनुदान मिळवून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील मोराळा सज्जाचे तलाठी ...

लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहात पकडले
आष्टी : जमीन नावे करणे आणि अनुदान मिळवून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील मोराळा सज्जाचे तलाठी बाळू बनगे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी दीड वाजता येथील बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तलाठी बनगे यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ, आई, वडील, बहीण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४,५०० रुपये लाचेची मागणी तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी केली होती. तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. मंगळवारी बसस्थानक परिसरात सापळा रचला. तर लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी बाळू बनगे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रवींद्र परदेशी, पोलीस नाईक श्रीराम गिराम, पो. शि. भारत गारदे, पो. शि. संतोष मोरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन आष्टी पोलीस ठाण्यात हजर केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.