रोखपालाने मागितली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:28+5:302021-06-20T04:23:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील जिल्हा सहकारी बँकेच्या ...

The bribe demanded by the cashier | रोखपालाने मागितली लाच

रोखपालाने मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी रोखपालावर शनिवारी (१९ जून) एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुंदर भागवतराव बांगर असे लाच घेणाऱ्या रोखपालाचे नाव आहे. बांगर याने तक्रारदार संस्थेचे लेखा परीक्षण केले होते. लेखा परीक्षण शुल्काच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. लाचेची मागणी केल्याप्रकरणी बांगरवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी, पोलीस नाईक श्रीराम गिराम, गारदे, मोरे यांनी केली.

Web Title: The bribe demanded by the cashier