मुलाच्या वडिलांना अटक, पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:01 IST2019-09-08T00:00:11+5:302019-09-08T00:01:04+5:30
बुधवारी एका १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहण करुन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मदत करणारे मुलाचे मित्र त्याचे वडील व त्यांचे मित्र यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाच्या वडिलांना अटक, पोलीस कर्मचारी निलंबित
बीड : बुधवारी एका १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहण करुन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मदत करणारे मुलाचे मित्र त्याचे वडील व त्यांचे मित्र यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडीलांना अटक केली असून न्यायालयाने ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
या प्रकरणाची तक्रार दडपण्याचा प्रकार करणारे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सत्यवान गर्जे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी दिरंगाई का झाली, अशा संवेदनशिल विषयात शहर ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष का घातले नाही, यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले. तसेच या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. याबाबत वैद्यकीय तपासणीच्या आधारे वय निश्चित केले जाणार आहे. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यासंदर्भातील कायद्यातील सुधारणांचा आधार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि भारत राऊत व त्यांचे सहकारी करत आहेत.
सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
अल्पवयीन मुलीवर अपहरण करुन अत्याचार ही घटना काळीमा फासणारी आहे. यासंदर्भात शहरातील विविध संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला जात आहे. यासंदर्भात आरोपीला मदत करणाºयांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अशोक हिंगे, बी.बी.जाधव, अशोक सुखवसे, अॅड गणेश पोकळे, कुंदा काळे यांच्यासह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.