पोहण्यासाठी गेलेला मुलगा कालव्यात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:12+5:302021-03-10T04:33:12+5:30

गेवराई : शहरापासून जवळच असलेल्या कोल्हेर शिवारातील कालव्यात १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ...

The boy who went for a swim was carried into the canal | पोहण्यासाठी गेलेला मुलगा कालव्यात वाहून गेला

पोहण्यासाठी गेलेला मुलगा कालव्यात वाहून गेला

गेवराई : शहरापासून जवळच असलेल्या कोल्हेर शिवारातील कालव्यात १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. यानंतर दुपारपर्यंत शोध लागला नव्हता.

शहरातील संजय नगर भागातील चार ते पाच मुले मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक १४ वर्षीय मुलगा पोहता येत नसल्याने व कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तो वाहून गेला. ऋषिकेश डिगांबर शेवाळे (१४, रा. संजय नगर, गेवराई) असे कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आपल्या मित्रांसोबत मंगळवारी सकाळी कोल्हेर शिवारातील कालव्यात पोहण्यासाठी पाण्यात उतरले; मात्र कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने ऋषिकेश शेवाळे हा पाण्यात वाहून गेला. ही माहिती सोबत असलेल्या मित्राने घरी येऊन सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाइकांनी ऋषिकेशचा शोध सुरू केला. मात्र कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. तोपर्यंत घटनास्थळी पोलीस व महसूलचे कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नव्हते.

===Photopath===

090321\20210309_144414_14.jpg~090321\sakharam shinde_img-20210309-wa0020_14.jpg

===Caption===

गेवराई येथील काेल्हेर शिवारात कालव्यात पोहण्यासाठी गेलेला ऋषिकेश शेवाळे वाहून  गेला.~

Web Title: The boy who went for a swim was carried into the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.