शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

आईबद्दलचे अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 5:37 PM

मुलाला मारहाण करत आईबद्दल वापरले अपशब्द

केज ( बीड ) : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने आई विषयी अपशब्द बोलून  दोघांनी मारहाण केल्यामुळे खचून गेलेल्या अल्पवयीन मुलाने शर्टने बाथरूमच्या खिडकीस गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या तक्रारी वरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथे वसंत लांब यांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. रविवारी ( दि ९) सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास कामानिमित्त ते शेतात गेले. यावेळी हॉटेल त्यांचा १७ वर्षीय मुलगा विक्रम सांभाळत होता. दरम्यान, कापले वस्तीवरील बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाथ लांब (नागरगोजे) हे दोघेजण हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. विक्रमने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बळीराम आणि सुभाषने विक्रमला मारहाण करत त्याच्या आईबद्दल अपशब्द वापरले. काहीवेळाने वसंत लांब हॉटेलवर परत आले. विक्रमने त्यांना रडतरडत घडलेली घटना सांगितली. त्यांनी विक्रमला समजावून सांगितले. परंतु, आईबद्दल वापरलेले अपशब्द त्याच्या जिव्हारी लागले होते. यातूनच विक्रमने रात्री ९:०० वाजेच्या दरम्यान बाथरुममध्ये गळफास घेतला. गळफास घेतल्याचे आढळून येताच नातेवाईकांनी विक्रमला खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.

या प्रकरणी वसंत लांब यांनी दि. १३ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. ३०५, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू