आजार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:09+5:302021-07-02T04:23:09+5:30
----------------------- पावसात भिजणे धोकादायक अंबाजोगाई : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेकजण आनंद घेण्यासाठी पावसात भिजत असतात. मात्र, त्यामुळे सर्दी, ...

आजार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा
-----------------------
पावसात भिजणे धोकादायक
अंबाजोगाई : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेकजण आनंद घेण्यासाठी पावसात भिजत असतात. मात्र, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. अनेक युवक भर पावसात सुसाट वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असते.
--------------------------
सायकलची खरेदी करण्याकडे कल
अंबाजोगाई : कोरोनामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेकजण नियमित व्यायाम, भोजनाकडे लक्ष देत आहेत. दररोज सायकलिंग केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच आरोग्य सुरळीत राहते. त्यामुळे अनेकांचा सायकल खरेदीकडे कल वाढला आहे. असे सायकल विक्रेते अशोक खंदारे यांनी सांगितले.
-----------------------------
सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा पंप बसविल्यास नागरिकांची उन्हाळ्याच्या दिवसांतही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी मुडेगावचे माजी सरपंच दत्तासाहेब जगताप यांनी केली आहे.
----------------------------
धूर फवारणी करण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील काही वॉर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वॉर्डामध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.