गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 17:45 IST2020-11-13T17:45:08+5:302020-11-13T17:45:58+5:30
गेवराई येथून बेपत्ता असल्याची बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल होती.

गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळला
बीड : गेवराई येथील बेपत्ता जिल्हा परिषद शिक्षकाचा मृतदेह पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये गुरुवारी दुपारी आढळून आला. धरणातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी धाव घेत नपच्या बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह हा रंगनाथ विश्वनाथ शिंदे (४५, रा. पांगरी रोड, बीड) यांचा असल्याचे समजले. रंगनाथ शिंदे हे गेवराई येथे जिल्हा परिषद शिक्षक आहेत. ते गेवराई येथून बेपत्ता असल्याची बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल होती. बीड ग्रामीण पोलीस पथकाने मृतदेह बाहेर काढला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
माहिती मिळताच घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. बेपत्ता असल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल होती. ही आत्महत्या आहे की, आणखी काही याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपासाला गती मिळेल.
- एस. आर. साबळे, पोलीस निरीक्षक, बीड ग्रामीण