कळसंबरमध्ये बेपत्ता विवाहितेचा आढळला विहिरीत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST2021-07-30T04:35:42+5:302021-07-30T04:35:42+5:30

बीड : तालुक्यातील कळसंबर येथील २६ वर्षीय बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ ...

The body of a missing married woman was found in a well in Kalsambar | कळसंबरमध्ये बेपत्ता विवाहितेचा आढळला विहिरीत मृतदेह

कळसंबरमध्ये बेपत्ता विवाहितेचा आढळला विहिरीत मृतदेह

बीड : तालुक्यातील कळसंबर येथील २६ वर्षीय बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत मृतदेह विच्छेदनासाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणला. तिथे शवविच्छेदन करण्यात आले. विवाहितेच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुवर्णा जीवन तांगडे (रा. कळसंबर, ता. बीड, वय २६) असे मृतदेह आढळलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. २८ जुलैपासून ही महिला बेपत्ता होती. सुवर्णा बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरातील नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता. रात्रभर शोधाशोध करूनही सुवर्णा मिळून आल्या नाहीत. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, २९ जुलै रोजी सकाळी सुवर्णा यांचा मृतदेह कळसंबर शिवारातील विहिरीत तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पाहणी करून मृतदेह विच्छेदनासाठी नेकनूर येथील रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, नेकनूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुवर्णाच्या मृत्यूबाबत नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The body of a missing married woman was found in a well in Kalsambar