राजमुद्राच्या शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST2021-03-04T05:03:41+5:302021-03-04T05:03:41+5:30

जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारी अशी राजमुद्रा संघटनेची ओळख असून संघटनेतील सदस्य सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. संघटनेच्या ...

Blood donation of 51 donors in Rajmudra camp | राजमुद्राच्या शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

राजमुद्राच्या शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारी अशी राजमुद्रा संघटनेची ओळख असून संघटनेतील सदस्य सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ५१ तरुणांनी रक्तदान केले तर २५ गरीब कुटुंबांना दोन महिना पुरेल एवढ्या किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना २५ डझन वह्या व साहित्य वाटप करण्यात आले. कडक उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या लहान व्यावसायिकांना उन्हापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. राजमुद्रा संघटनेचे अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुरेश शेळके, रणजित पिंगळे, सचिन पवार, बाळासाहेब लोखंडे, नितीन सपकाळ, बबलू सावंत, उमेश पवार, सुनील ठोंबरे, गणेश माने, सचिन सिरसाट, विजय चाळक, भाऊसाहेब चव्हाण, शाम सपकाळ, संदीप बुधनर उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 51 donors in Rajmudra camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.