शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:55 PM

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन : प्रशासनाला मागण्यांचे निवेदन; तर सरकारच्या कारभारावर टीका

बीड : शेतकऱ्यांचे नाव घेऊन एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या सरकारने शेतकरी व जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. मागील सरकारने घेतलेले चांगले निर्णय रद्द करत जनमताचा विश्वासघात केला. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले. दिवसभर आंदोलनादरम्यानभाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि शेतकरी सहभागी झाले होते.माजलगाव येथे आंदोलनमाजलगाव : येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास सुरु वात करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष अरूण राऊत , माजी नगराध्यक्ष अशोक तिडके , बबनराव सोळंके , ईश्वर खुर्पे , नगरसेवक विनायक रत्नपारखी , मनोज फरके, दत्ता महाजन आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.केजमध्ये पाच तास आंदोलनकेज : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. तहसीलदार दुलाजी मेंढके यांना निवेदन दिले. आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, विष्णू घुले, जीवन हंगे, पंजाब देशमुख, दत्ता धस, ज्ञानेश्वर चवरे, संदीप पाटील, संभाजी इंगळे, महादेव सुर्यवंशी, मुरलीधर ढाकणे, सुलाबाई सरवदे, डॉ. अमोल जाधव, पंडीत सावंत,शेषेराव कसबे, महादेव केदार आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.उपविभागीय कार्यालयासमोर धरणेपरळी : येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनात भाजपा राज्य चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, दत्ताप्पा ईटके, अशोक जैन, विकासराव डुबे, निळकंट चाटे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, उत्तम माने, भास्कर रोडे, वैजनाथ जगतकर, प्रा. विजय मुंडे, भिमराव मुंडे, प्रा. पवन मुंडे, रमेश कराड, श्रीराम मुंडे, राजेश गीते,चंद्रकांत देवकते, रवि कांदे, शिवाजी गुट्टे आदी सहभागी झाले.आष्टीत भीमराव धोंडे यांची टीकाआष्टी : राज्यात आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार असल्याची टीका माजी आ. भीमराव धोंडे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन प्रसंगी केली. आंदोलनात सविता गोल्हार, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, विजय गोल्हार, सावता ससाणे, संतोष चव्हाण, तात्या कदम, लाला कुमकर, बबन झांबरे,वाल्मिक निकाळजे,अ‍ॅड. साहेबराव म्हस्के, आरपीआयचे अशोक साळवे, हनुमंत थोरवे, पांडुरंग गावडे संभाजी जगताप, अ‍ॅड . रत्नदीप निकाळजे,अज्जु भाई आदींचा सहभाग होता.अंबाजोगाईत धरणे आंदोलनअंबाजोगाई : मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे, सभापती मधुकर काचगुंडे, नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, सुरेश कराड, अनंत लोमटे, गणेश कराड, नेताजी देशमुख, हिंदुलाल काकडे, दिलीप देशमुख, विलास जगताप, सतीश केंद्रे, अ‍ॅड. संतोष लोमटे, अ‍ॅड. राजेसाहेब लोमटे, प्रशांत आदनाक आदी सहभागी होते.धारूर तहसीलसमोर अंदोलनधारूर : येथील नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बाळासाहेब गायकवाड ,अंगद मुंडे, नगरसेवक बालाजी चव्हाण, शेख गफार , बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे, अ‍ॅड. मोहन भोसले, शिवाजी मायकर, रमेश नखाते, अर्जुन तिडके, भारत सोळंके, संतोष सिरसट यांनी सहभाग घेतला.गेवराईगेवराई : आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, राजेंद्र राक्षसभुवनकर, राहुल खंडागळे, भगवान घुंबार्डे, जि.प.सदस्य प्रल्हाद माने, शाम कुंड, उद्धव मडके, कृष्णा मुळे, दादासाहेब गिरी, महेश दाभाडे, दीपक सुरवसे, अमोल मस्के, राजेंद्र भंडारी, लक्ष्मण चव्हाण, संजय इंगळे आदी उपस्थित होते.वडवणीयेथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार सुरेखा स्वामी यांना निवेदन दिले. यावेळी माजी आ. केशवराव आंधळे, प्रा.सोमनाथ बडे, बन्सीधर मुंडे,तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, सजंय आंधळे,बाबरी मुंडे, मंचिद्र झाटे,अंकुश वारे, महादेव जमाले, श्रीमंत मुंडे, ईश्वर तांबडे, महादेव रेडे, संतोष शिंदे, सतिष मुजमुले, धनराज मुंडे, सचिन सानप आदी सहभागी होते.शिरुर कासारयेथील तहसील कार्यालयासमोर भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. सदस्य रामदास बडे ,रामराव खेडकर , पं.स.उपसभापती जालींदर सानप ,सदस्य प्रकाश खेडकर, एम. एन. बडे, सुरेश उगलमुगले, कालीदास आघाव,किशोर खोले,विष्णु नितळ, बाजीराव सानप,महारूद्र खेडकर, गोकुळ सानप, अर्जुन खेडकर, वसंतराव सानप आदींचा सहभाग होता

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाagitationआंदोलन