अंबाजोगाईत भाजपचा बूथ मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:11+5:302021-02-13T04:33:11+5:30
अंबाजोगाई येथे वसुंधरा विद्यालयाच्या सभागृहात भाजप बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोविंद केंद्रे बोलत ...

अंबाजोगाईत भाजपचा बूथ मेळावा
अंबाजोगाई येथे वसुंधरा विद्यालयाच्या सभागृहात भाजप बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोविंद केंद्रे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के होते. व्यासपीठावर आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, शंकर देशमुख, नीळकंठ चाटे, देवीदास नागरगोजे, अच्युत गंगणे यांची उपस्थिती होती.
सेवाभाव अंगीकृत ठेवून जो कार्य करतो. तोच खरा कार्यकर्ता, असे सांगून बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतम मुंडे यांनी अहमदनगर- बीड- परळी रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी ५२७ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणल्याबद्दल या बैठकीत खा. मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, यांची भाषणे झाली. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अच्युत गंगणे यांनी केले. सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. सुधीर धर्मपात्रे यांनी मानले.