शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", महाराष्ट्रातील भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:48 IST

देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

बीड : देशभर गाजत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. 

दरम्यान, अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी संघर्षयोद्धा भाजप जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार मुंडे म्हणाल्या, केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणून मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या.  

आखाड्याबाहेरील 'कुस्ती' अद्याप सुरूच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैगिंक छळ केला असून त्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी देशातील नामांकित पैलवान २३ एप्रिलपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे दिसले. आंदोलक नवीन संसद भवनासमोर निर्दर्शनं करण्याच्या प्रयत्नात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी तूर्तास हा निर्णय मागे घेतला आहे. 

  

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेsexual harassmentलैंगिक छळVinesh Phogatविनेश फोगट