भाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 21:12 IST2019-09-17T20:56:46+5:302019-09-17T21:12:44+5:30
४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमानुसार गुन्हे दाखल

भाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल
केज (बीड ) : केजच्या भाजपा आमदार संगीता ठोंबरेसह पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी केज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणात कथित संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, आमदार संगीता ठोंबरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी त्या संबंधित तक्रार केज न्यायालयात दाखल केली होती.
केज न्यायालयाने यावरील सुनावणीदरम्यान डॉ. विजयप्रकाश ठोंबरे व आमदार संगिता ठोंबरे यांच्या विरोधात ४२० , ४६७, ४६८, ४७१ कलमानुसार गुन्हे दाखल करावे आणि यांसदर्भात चौकशी करून चार्जशीट दाखल करण्याचे आदेश न्यायालयात दिले होते.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. विजयप्रकाश ठोंबरे आणि आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.