खडकळी तलावाच्या काठी १२ मृत पक्षी आढळयाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 18:38 IST2021-01-15T18:37:06+5:302021-01-15T18:38:42+5:30
Bird Flu दोन दिवसांपूर्वीच पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने तपासणीसाठी नमुने घेण्यात अडचण

खडकळी तलावाच्या काठी १२ मृत पक्षी आढळयाने खळबळ
- नितीन कांबळे
कडा- आष्टी तालुक्यातील केरूळ गावापासून जवळ असलेल्या खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी १२ पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनस्थळी पशुसंर्वधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अनेक कावळ्याचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही दोन मृत कावळे आढळे होते. तसेच शिरापुर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्याचे उघडकीस आल्याने बर्ड फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. आता तालुक्यातील खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी १२ पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पक्ष्यांचा मृत्यू पक्षी दोन दिवसा पूर्वी झाला असल्याने त्यांचे तपासणीसाठी नमुने घेता आले नाहीत. यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी दिली आहे.