शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:02 IST

अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती.

Beed Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. सहा समाजकंटकांनी बेदम मारहाण करत संतोष देशमुख यांचा जीव घेतला. देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे, याचा उलगडा झाला. विविध हत्यारांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्यांच्या शरीरात दीड लीटर रक्त साकळलं होतं. अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगात धाव घेतली होती. सोनवणे यांच्या या मागणीला यश आलं असून याप्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल करत स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

"संतोष देशमुख यांची टॉर्चर करून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने याची दखल घेत कारवाई करावी," अशी भूमिका बजरंग सोनवणे यांनी मांडली होती. या मागणीला प्रतिसाद देत आता आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

या गुन्ह्याचा तपास, पोलीस आणि न्यायव्यवस्था यावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे लक्ष असणार आहे. आयोग जिल्ह्यामध्ये तातडीने टीम पाठवून कारवाई करणार आहे. शिवाय या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता. "बीड जिल्ह्यातील हे प्रकरण देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा आघात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली होती.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणbajrang sonwaneबजरंग सोनवणेBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीwalmik karadवाल्मीक कराड