शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:46 IST

मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.

Walmik Karad: पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकील आणि वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज कोर्टाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसा अर्जही पोलिसांनी केजच्या वरिष्ठ कोर्टाकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर एसआयटीकडून पुन्हा कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आऱोपींवर मकोका कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी कराड याला या गुन्ह्यात घेण्यात आले नव्हतं. त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मीक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून कराडवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कराडवर खुनाचा गुन्हाही दाखल होणार?

२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला यापूर्वी १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मीक कराड याने खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले हेदेखील आरोपी आहेत. २९ नोव्हेंबरला खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही, म्हणून त्याच प्रकरणातील पुढचे पाऊल हे ६ डिसेंबरला विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांनी टाकले का? खुनाचा व कराडांचा काही संबंध आहे का, हे कराड व इतर आरोपींच्या चौकशीतून सीआयडीला स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडे