शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लाचप्रकरणी बीडमध्ये एपीआय केळे एसीबीला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.कॉ. दत्तात्रय बिक्कड व छत्रभुज थोरात यांना रंगेहाथ पकडले होते तर फरार एपीआय ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.कॉ. दत्तात्रय बिक्कड व छत्रभुज थोरात यांना रंगेहाथ पकडले होते तर फरार एपीआय केळे हा मंगळवारी एसीबीला शरण आला तर अशोक हंडीबागला त्याच्या घरून बेड्या ठोकल्या. पलायन केलेल थोरात अद्यापही फरार आहे.

खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चिंचपूर येथील एका व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.कॉ. दत्तात्रय बिक्कड, छत्रभुज थोरात (झिरो पोलीस) यांना रंगेहाथ पकडले होते तर एपीआय केळे व अशोक हंडीबाग हे फरार झाले होते. ताब्यात असलेल्यांपैकी छत्रभुज थोरातने लघुशंकेचा बहाणा करून पलायन केले होते. तो अद्यापही फरार आहे. दरम्यान, फरार असलेला एपीआय केळे मंगळवारी दुपारी एसीबीला शरण आला. तर हंडिबाग याला धारूर तालुक्यातील चिंंचपूर या त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या. या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली. पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरूच असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाCrimeगुन्हा