शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्र प्रतिष्ठान व भेंड खुर्द ग्रामस्थांकडून संघर्ष धान्य बँकेत आठ क्विंटल धान्य जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST

गेवराई : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, या संत वचनाप्रमाणे ...

गेवराई : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, या संत वचनाप्रमाणे भेंड खुर्द ग्रामस्थ व भूमिपुत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष धान्य बँकेत आठ क्विंटल धान्य जमा करण्यात आले. भेंड खुर्द या गावात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली होती. या जयंतीचे औचित्य साधून भूमिपुत्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांकडून संघर्ष धान्य बँकेसाठी धान्य जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार भूमिपुत्र प्रतिष्ठान यांनी केलेल्या आवाहनाला सर्व ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व ग्रामस्थांतर्फे आठ क्विंटल धान्य जमा करण्यात आले.

‘तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी’, या संत गाडगे महाराजांनी दिलेला संत वचनाचा वारसा जपत भूमिपुत्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी हे धान्य संघर्ष धान्य बँकेत जमा केले. गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष धान्य बँकेत अनेक दानशूर व्यक्ती एक किलोपासून शंभर किलोपर्यंत धान्य जमा करत आल्या आहेत. परंतु, भेंड खुर्द ग्रामस्थांनी आठ क्विंटल धान्य जमा करून दातृत्वाचा एक नवा इतिहास निर्माण केला आहे. कोरोनाच्या काळामध्ये गावातील धार्मिक उत्सव व इतर कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे अन्नदानामध्ये खंड पडू नये म्हणून ग्रामस्थांनी अनाथ, वंचितांसाठी हे धान्य पुरवले आहे. भेंड खुर्द येथील भूमिपुत्र प्रतिष्ठान हे गावातील सुशिक्षित तरुण, नोकरवर्ग, तरुण व सधन व्यक्ती एकत्र येऊन चालवत आहेत. या माध्यमातून गावातील शैक्षणिक प्रश्न, शेतीचे प्रश्न, सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम भूमिपुत्र प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. गावातील नोकरदार मंडळींचा यामध्ये विशेष हातभार असतो. तसेच कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी गावातील नोकरदार मंडळी आपले एक महिन्याचे वेतन यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमा करत आहेत. संपूर्ण भेंड खुर्दकडून हे धान्य आम्ही आपल्याकडे सुपूर्द करत आहोत, त्यामुळे कुणाचेही नाव यामध्ये येऊ नये, अशी विनंती गावातर्फे करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र प्रतिष्ठान व संघर्ष धान्य बँकेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गेवराईतील वृत्तपत्र वितरक कृष्णाजी सरोदे ऊर्फ तात्या यांना ५० किलो धान्याची मदत करण्यात आली. कृष्णा सरोदे हे जुन्या काळातील वृत्तपत्र विक्रेते असून, ते आता थकले आहेत. भूमिपुत्र प्रतिष्ठान व भेंड खुर्द गावाने दिलेल्या मदतीबद्दल कृष्णा सरोदे यांनी भेंड खुर्दमधील ग्रामस्थांचे आभार मानले.

===Photopath===

040421\sakharam shinde_img-20210404-wa0012_14.jpg

===Caption===

भूमिपुत्र प्रतिष्ठान व भेंड खुर्द ग्रामस्थांच्या वतीने संघर्ष धान्य बँकेत आठ क्विंटल धान्य जमा करण्यात आले.