शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:16 IST

नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : नगपालिकेचा गलथन कारभार, नागरिकांमध्ये नाराजी

भोकरदन : नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.जुई, बानेगाव, धरण कोरडे पडल्यामुळे शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अकोला देव येथून टँक्करने पाणी आणण्यात येत असले तरी ४० ते ४५ किलोमीटर अंतर आल्यामुळे टँककरच्या पूर्ण फेऱ्या होत नाही. त्यामुळे शहारत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर परिषद पाणीटंचाईचे निवारण करण्यात अपयशी ठरत असून आलेले पाणी नागरिकांना व्यवस्थित वाटप करण्यात येत नाही. अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुध्दा या नागरिकांनी आंदोलन केले होते. तरी सुध्दा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी नुजेर शाह, महेबूब भारती, इसरार पठान, फहीम कादरी, जावेद शेख, मुजीब कुरेशी, आसिफ कुरैशी, अलीम शाह, शेख जाहिद, शेरखान, मोहमद शाहरुख शेख शाहरुख, अनीस भारती, रहीम कुरेशी, बिस्मिल्लाह कुरेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुखाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणाºया टँकर बाबत माहिती दिली. व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.दोन दिवसांत : पाणीपुरवठा सुरळीतयाविषयी न.पं. मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले की, दोन्ही धरणे कोरडी पडली आहे. शिवाय चराचे पाणी कमी झाल्यामुळे शहरात पाणी टंचाई वाढली आहे. अकोला देव येथून टँकरच्या फेºया पूर्ण होत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व आम्ही खडक पूर्णा धरणातून जाफराबाद पर्यंत पाणी आणले असून दोन दिवसातच शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असेही सोंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन