साहाय्यक पुरवठा अधिकारीपदी भालेराव - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:42+5:302021-08-12T04:37:42+5:30
जवळपास मागील तीन वर्षांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त असून, त्या जागेवर प्रभारी उपजिल्हाधिकारी काम पाहत आहेत. तर, ...

साहाय्यक पुरवठा अधिकारीपदी भालेराव - A
जवळपास मागील तीन वर्षांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त असून, त्या जागेवर प्रभारी उपजिल्हाधिकारी काम पाहत आहेत. तर, साहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून सचिन खाडे यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांना बीड तहसीलदार या रिक्त जागेवर प्रभारी पदभार दिल्यामुळे त्यांचेदेखील दुर्लक्ष पुरवठा विभागात झाले. दरम्यान, पुन्हा त्यांनी गेवराई तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाले होते. त्या जागेवर मूळ पदावरील तहसीलदार अनिता शंकरराव भालेराव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अद्याप रुजू झालेल्या नाहीत. मात्र, बीड पुरवठा विभागात मूळ पदावरील अधिकारी आल्यामुळे अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, एक सुसूत्रता आणणे गरजेचे आहे.
वडवणी तहसीलदारपदी भारस्कर
वडवणी येथील तहसीलदारपद हे मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. त्या जागेवर औरंगाबाद येथील साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता नरहरी भारस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वडवणी तहसील कार्यालयातील कामकाजात सुधारणा होऊन सुरळीत कामकाज चालण्याची आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.