शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी

By सोमनाथ खताळ | Updated: July 10, 2024 13:03 IST

बीडच्या लाचलुचपत विभागाकडून कार्यकारी अभियंत्यावर अपसंपदाचा गुन्हा दाखल

बीड : उत्पन्न सव्वा कोटी, मालमत्ता अडीच कोटी आणि खर्च पावणेदोन कोटी रूपये एवढी उधळपट्टी करूनही तीन काेटींची अपसंपदा कमावणाऱ्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात अंबाजोगाईत अपसंपदाचा गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. अभियंत्याला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या रक्कमेचा पहिल्यांदाच अपसंपदाचा गुन्हा दाखल झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. संजयकुमार शशिकांत कोकणे (वय ५१) व ज्योती संजयकुमार कोकणे (रा. पाखल रोड, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

कोकणे हा अंबाजोगाई येथील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होता. सध्या तो अंधेरी, मुंबई येथे त्याच पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी ज्योती या गृहिणी आहेत. कोकणे याला २०२२ मध्ये ३० हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहात पकडले होते. त्याची घरझडती घेतली असता त्यावेळी लाखो रुपये सापडले होते. त्यानंतर ‘एसीबी’ने परवानगी घेऊन त्याच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्याच्याकडे उत्पन्न, खर्च, मालमत्ता वगळून त्याच्याकडे ३ कोटी २ लाख ६४ हजार १४१ रुपयांची अपसंपदा आढळली. हा सर्व आकडा १ सप्टेंबर २०१० ते २२ जून २०२२ या दरम्यानचा आहे. याप्रकरणी ज्योती कोकणे व संजयकुमार कोकणे यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक युनूस शेख करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, भारत गारदे आदींनी केली.

अभियंता ताब्यात, तर पत्नीला नोटीसअपसंपदा संदर्भात गुन्हा दाखल होताच कार्यकारी अभियंता संजय कोकणे याला मुंबईतून ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक डोळे, अंबादास पुरी, गणेश म्हेत्रे, सुदर्शन निकाळजे यांनी ही कारवाई केली. तसेच त्याची पत्नी ज्योती यांना ‘एसीबी’कडून नोटीस बजावली आहे.

पत्नी गृहिणी तरीही सव्वा कोटीची मालमत्तासंजय कोकणे याची पत्नी ज्योती कोकणे या गृहिणी आहेत. तरीही त्यांच्या नावे तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तसेच दागिन्यांवर २० लाख रुपये, तर पर्यटन यावरही या दाम्पत्याने तब्बल पावणेपाच लाख रुपये खर्च केले आहेत.

अभियंता ताब्यात, पत्नीला नोटीस२०२२ मध्ये लाच घेतल्याप्रकरणी संजयकुमार कोकणेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या मालमत्तेची उघड चौकशी केली असता ३ कोटी २ लाखांची अपसंपदा आढळली. तसेच त्यांची पत्नी गृहिणी असतानाही त्यांच्या नावे १ कोटी १२ लाखांची मालमत्ता आहे. या सर्व अनुषंगाने कायदेशीर बाबी पूर्ण करून कोकणे दाम्पत्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अपसंपदाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील कोकणे याला ताब्यात घेतले असून, त्याच्या पत्नीला नोटीस दिली आहे.- शंकर शिंदे, उपअधीक्षक, ‘एसीबी’, बीड

बापरे एवढा पैसा, तरीही लाचएकूण उत्पन्न - १,२६,७१,३७६मालमत्ता - २,४४,७२,६२८खर्च - १,८४,६२,८८९अपसंपदा - ३,०२,६४,१४१

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग