बंगाली कारागिराला मारहाण, एकाला गावठी कट्ट्यासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:35 IST2018-10-01T00:34:22+5:302018-10-01T00:35:05+5:30
दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कारागिराला गावठी कट्ट्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी एकाला गावठा कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंगाली कारागिराला मारहाण, एकाला गावठी कट्ट्यासह अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कारागिराला गावठी कट्ट्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी एकाला गावठा कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
पश्चिम बंगालमधील कन्हेैय्या गुगा हा चौसाळा येथे चंदन नाईकवाडे यांच्या सोन्या चांदीच्या दुकानावर कारागिर म्हणून कामाला आहे. श्निवारी रात्री दहाच्या सुमारास त्याला सागर शहादेव नाईकवाडे (रा. मुक्ताईनगर, वय २५) याने अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने सागरने त्याच्याकडील गावठी कट्टा कन्हैय्याच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, औटे, कदम, राठोड, एस. बी. राठोड, डोंगरे, गर्जे यांनी तत्काळ सागर नाईकवाडे यास ताब्यात घेतले. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक मेसे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सय्यद मजहर, रवींद्र जाधव करत आहेत.