शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धूलिवंदनाला गाढवावर सवारी अन् ५ ग्रॅम सोन्याची अंगठी; विड्याच्या जावयाची 'रॉयल' मिरवणूक काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:21 IST

"मी नाही येणार!"; गाढवावर बसण्याच्या भीतीने जावई पळाले; विडा गावात 'जावई शोध मोहीम' सुरू

विनोद ढोबळेविडा (जि. बीड) : होळी आणि धुलिवंदनानिमित्त जावयाला मानपान देण्याची पद्धत सर्वत्र असली तरी केज तालुक्यातील विडा गावात मात्र 'जावयाची गाढवावरून धिंड' काढण्याची अनोखी आणि ९० वर्षांची जुनी परंपरा आहे. गेल्या वर्षी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, एका वर्षाच्या खंडानंतर यंदा ३ मार्च रोजी पुन्हा ही 'गाढव धिंड' निघणार असल्याने गावात उत्साह संचारला आहे.

तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांनी ही परंपरा सुरू केली असून, आतापर्यंत ९० हून अधिक जावयांची अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावातील सर्वात 'हटके' जावयाची निवड केली जाते. त्याला 'चप्पल-बुटां'चा हार घालून गाढवावर बसवले जाते आणि ढोल-ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या शेवटी हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामपंचायतीकडून कपड्यांचा आहेर, तर सासरच्या मंडळींकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन जावयाचा गौरव केला जातो. येत्या मंगळवारी (३ मार्च) हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, राजकुमार पटाईत यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

जावई झाले 'नॉट रीचेबल'!सध्या विडा गावात 'जावई शोध मोहीम' अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने सुरू आहे. आपल्यालाच गाढवावर बसावे लागेल या भीतीने अनेक जावयांनी गाव सोडले आहे, तर काही जणांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. ग्रामस्थ मात्र जावयाला शोधून ग्रामपंचायत कार्यालयात 'नजरकैदेत' ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

परंपरेची वैशिष्ट्ये इतिहास: ९० वर्षांपेक्षा जुनी परंपरा.प्रथा : जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक.बक्षीस : ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि आहेर.विशेष : जावयाचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांची विशेष पथके.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Donkey Procession for Son-in-Law with Gold Ring in Beed!

Web Summary : In Bida, Beed, a 90-year tradition involves parading a son-in-law on a donkey during Dhulivandan. The 'luckiest' son-in-law receives a gold ring and gifts, sparking a village-wide 'son-in-law hunt' as many try to avoid this honor.
टॅग्स :BeedबीडHoliहोळी 2026