शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बीडच्या चोरट्यांची चोरीच्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशांवर पुणे, मुंबईत ‘ऐश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 19:26 IST

दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देदोन चोरट्यांसह २० दुचाकी जप्त एलसीबी, विशेष पथकाची कारवाई

बीड : बीड, लातुर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जावून ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हे खेळ  पोलिसांनी बंद पाडला आहे. दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने संयुक्तरित्या केली.

सुशांत रामनाथ मुंडे (२१ रा.साळींबा ता.वडवणी) व महेश (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी पकडलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या व अन्य एकजण अद्यापही फरार आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतीने सुरू केला. पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना हे चोरटे केज तालुक्यात असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सपोनि अमोल धस आणि पोउपनि आर.ए.सागडे यांना आदेश देत तपासाला पाठविले. त्यांनीही दोन चोरट्यांना केज-धारूर रोडवर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, एलसीबीचे पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि आर.ए.सागडे, सपोनि अमोल धस, गलधर, बालाजी दराडे, गणेश दुधाळ, सखाराम पवार, साजीद पठाण, राजु वंजारे, हराळ, पांडूरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली आहे.

१५ गुन्हे उघडपुणे, हाडपसर, स्वारगेटसह बीड जिल्ह्यातील सिरसाळा, अंबाजोगाई शहर, धारूर, परळी शहर, परळी ग्रामीण, वडवणी व लातुर जिल्ह्यातील जवळपास १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही पोलिसांकडून दुचाकींचा शोध घेतला जात आहे. आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुचाकी चोरांची टोळी सक्रियसुशांत, महेशसह अन्य दोघे अशी चौघांची टोळी आहे. मागील दोन महिन्यापासून ही टोळी बीड जिल्ह्यात सक्रिय होती. टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही टोळीचा म्होरक्या फरार आहे. लवकरच इतर दोघांना अटक करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शिक्षण नको, मौज करायला पाहिजे...सुशांत व महेश यांना शिक्षणाची आवड नाही. घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वाईट मित्रांच्या संगतीने ते गुन्हेगारीकडे वळले. मौज मस्ती करायला पैसे कमी पडत असल्याने त्यांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. सुरूवातीला यामध्ये यशस्वी झाले. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत.

टॅग्स :ArrestअटकtheftचोरीMONEYपैसा