तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 17:46 IST2022-12-26T17:46:16+5:302022-12-26T17:46:46+5:30
मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे.

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी
बीड- तत्कालीन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर रस्त्यावर उतरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागीय आयुक्तपदी पुनर्नियुक्ती करा या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. तुकाराम मुंढे बदली विरोधी कृती समितीच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. मात्र सातत्याने त्यांची बदली केली जात असल्याने बीडकरांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या समर्थनात बीड जिल्हावासीय रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांचं समर्थन करीत समस्त बीडकर रस्त्यावर उतरत त्यांच्या पुनर्नियुक्तीची मागणी केली आहे.