शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: परळी-गंगाखेड मार्गावरील पुलावर पाणी; वाहतूक विस्कळीत, लाडझरी शाळेत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:05 IST

परळीत पावसाचा हाहाकार; रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका, परळी-गंगाखेड मार्गावरील वाहतूक ठप्प

परळी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे परळी-गंगाखेड मार्गावरील पुलावरून पाणी वाहिल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले असून त्याचा फटका थर्मल प्रकल्पाकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला. 

परळी–गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून रस्त्यावरील खड्डे आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदनं देऊनही प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांच्या नेतृत्वाखाली १९ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या कडेला ‘बेशरम लागवड आंदोलन’ छेडण्यात आले होते. या आंदोलनात शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शनिवारी दाऊतपुरजवळील खरोळा नदीला पूर आल्याने काही नागरिकांच्या बंगल्यात पाणी शिरले. वैजनाथ विभूतवार, लिंबाजी बिडगर, भास्कर बिडगर, ज्ञानोबा बिडगर व शिवाजी फड यांच्या घरांना पाणी लागले. दाऊतपुर-खडका रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहर परिसरातील अनेक पूल पाण्याखाली गेले तर चांदापूर धरण ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली. गोदाकाठ नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर ते जिजामाता उद्यान मार्गावर तसेच आझाद चौक परिसरात दर पावसात पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक दुकानदार रमेश सोळंके आणि विश्वनाथ देवकर यांनी केला. शनिवारी कन्हेरवाडी–देव्हाडा रोडवरील पूल वाहून गेला, तर मौजे भिलेगाव पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक बंद झाली. नागाळा तलाव (सेलू-परळी) पूर्णपणे भरून ओसंडला असून एका बाजूने पाणी सोडण्यात आले आहे.

लाडझरी शाळेत पाणी; नालीची मागणी धर्मापुरी मंडळातील मौजे लाडझरी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय महामार्गालगत नाली नसल्यामुळे तब्बल चार फूट पाणी साचले. पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक हैराण झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ ५०० मीटर नाली दुतर्फा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, परळी व धर्मापुरी मंडळात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तहसीलदार व्यंकटेश मुंडे, परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, मंडळ अधिकारी नीतापल्लेवाड व तलाठी विष्णू गीते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Bridge Overflow Disrupts Traffic; Water Enters Ladzari School

Web Summary : Heavy rains in Beed disrupt Parli-Gangakhed traffic as a bridge overflows. Incomplete roadwork adds to commuter woes. Flooding impacts homes, farms, and a school in Ladzari, prompting demands for drainage. Authorities assess the damage.
टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडा