बीडमध्ये चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक करणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:54 IST2018-12-15T17:54:24+5:302018-12-15T17:54:49+5:30
याप्रकरणी दोघांविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीडमध्ये चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक करणारे दोघे ताब्यात
बीड : चारचाकी वाहनातून दारू घेऊन जाताना बीड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सकाळी बीड शहरातील माळीवेस चौकात करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निखील नारायण माने (रा.आनंदवाडी ता.बीड) व केशव श्रीमंत खताळ (रा.कान्हापूर ता.वडवणी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे शनिवारी सकाळी आपल्या चारचाकी जीपमधून (एमएच ४३ डी ६६३६) दारू घेऊन जात होते. ही माहिती सपोनि नितीन पगार यांना मिळाली. त्यांनी आपल्या टिमला पाठवून जीप अडविली.
यावेळी जीपमध्ये विविध प्रकारची दारू आढळून आली. त्यानंतर दारू व वाहन असा जवळपास पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खताळ व माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सपोनि नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस.काळे, अशपाक सय्यद, आनंद हजारे यांनी केली.