शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मच्छिंद्रनाथ गडाच्या दरीत दोन कुजलेले मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:28 IST

सरपण गोळा करणाऱ्यांना दिसले मृतदेह; अंभोरा पोलिसांकडून मायंबा गड प्रकरणाचा तपास सुरू

- नितीन कांबळेकडा (आष्टी): आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल दरीत आढळून आले असून, यातील एका तरुणाचा केवळ सापळा उरला आहे, तर वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

सरपण वेचणाऱ्यांना दिसले मृतदेह गडावरील खोल दरीत सरपण गोळा करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले होते. दरीच्या दुर्गम भागात त्यांना मानवी अवशेष दिसताच त्यांनी गावात धाव घेऊन माहिती दिली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी मोठ्या शर्थीने हे मृतदेह बाहेर काढले.

ओळख पटली अन् कुटुंबीयांचा आक्रोश मयत निलेश नारायण घोंगरे (वय २६, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) हा महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता, पण तिथूनच तो बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी अंभोरा पोलिसात तक्रारही दिली होती. दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याची ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय ६५, रा. भिलवाडा, पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे निष्पन्न झाले.

नेमकं काय घडलं? दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. हे भाविक भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा रस्ता चुकल्याने दरीत पडले असावेत, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, एकाच ठिकाणी दोन मृतदेह वेगवेगळ्या वेळी आढळल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव आणि सोपान येवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Decomposed bodies of youth, elderly found at Machindranath Gad.

Web Summary : Two bodies, a young man's skeleton and an elderly man's decomposed body, were found in a valley near Machindranath Gad, triggering investigation. One was identified as missing Nilesh Ghongre. Police suspect accidental falls, but probe continues.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड