शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Beed: रेल्वेच्या अर्धवट कामाचे उद्घाटन केल्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक रेल्वे आंदोलन  

By शिरीष शिंदे | Updated: October 2, 2022 15:14 IST

Beed News: नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम अर्धवट आहे. असे असतानाही काही दिवसांपुर्वी या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी प्रतिकात्मक रेल्वे आंदोलन केले

- शिरीष शिंदेबीड - नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम अर्धवट आहे. असे असतानाही काही दिवसांपुर्वी या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी प्रतिकात्मक रेल्वे आंदोलन केले. उर्वरीत काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 

१९९५ साली नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली. अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकुण लांबी २६१ किलोमीटर असून अहमदनगर पासून आष्टी पर्यंत केवळ ६७ किलोमीटर अंतराचे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राजकीय इच्छाशक्ति अभावी रेल्वे मार्गाचे काम रखडल्यामुळे ३५४ कोटीं रुपयांचा प्रकल्प ४८०० कोटींच्या आसपास पोहचला आहे. मागील २२ वर्षांत केवळ ६७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेल्वे मार्गाच्या या अर्धवट कामाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करून शासन व लोकप्रतिनिधींकडून जनतेची दिशाभूल होत आहे असून उर्वरीत काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, राष्ट्रवादीचे नेते नीळकंठ वडमारे, अशोक हांगे, शेख युनुस, राहुल कवठेकर, सय्यद आबेद ,शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, शेख मुस्ताक, अशोक येडे, संतोष ढाकणे आदी सहभागी झाले होते. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यामार्फत पंतप्रधान, रेल्वे मंत्री यांना देण्यात आले.  आंदोलकांचे केले स्वागत रेल्वेसाठी सातत्याने आंदोलन करणारे आंदोलकांचे स्वागत यावेळी करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक रेल्वे समितीचे पदाधिकारी नामदेव क्षीरसागर, आ.सुनिल धांडे, सत्यनारायण लाहोटी, मंगेश लोळगे तसेच विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अशोक हांगे, संगमेश्वर आंधळकर, प्रा. पंडित तुपे, सी.ए. जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

टॅग्स :BeedबीडIndian Railwayभारतीय रेल्वे