बीड पोलिसांनी २६ वर्षांपूर्वी पकडलेला गांजा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:54 IST2018-10-09T18:52:57+5:302018-10-09T18:54:30+5:30
१९९२ साली बाग पिंपळगाव येथे गेवराई पोलिसांनी ८ क्विंटल ६० किलो गांजा जप्त केला होता.

बीड पोलिसांनी २६ वर्षांपूर्वी पकडलेला गांजा केला नष्ट
बीड : गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे २६ वर्षांपूर्वी पकडलेला ८ क्विंटल ६० किलो गांजा मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यालयावर ही कारवाई केली.
१९९२ साली बाग पिंपळगाव येथे गेवराई पोलिसांनी ८ क्विंटल ६० किलो गांजा जप्त केला होता. याची किंंमत तेव्हा ८ लाख ६० हजार रूपये होती. आता त्याची किंमत जवळपास ४० लाखापर्यंत पोहचते. हे प्रकरण न्यायालयात सुरू होते.
न्यायालयाकडून आदेश मिळताच हा गांजा नष्ट करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या उपस्थितीत बालाजी दराडे, राम यादव, बाबासाहेब डोंगरे, जगदीश करांडे, नारायण जाधव, नरेंद्र बांगर, वजना मापचे कल्याण दराडे यांनी केली.