बीडमध्ये जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 09:23 IST2018-10-30T09:19:17+5:302018-10-30T09:23:35+5:30
घरातील वाद आणि चारित्र्यावर पती संशय घेत असल्याने तणावातून केले कृत्य.

बीडमध्ये जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले
बीड : घरातील वाद आणि चारित्र्यावर पती संशय घेत असल्याने तणावात असलेल्या दीपाली राधेश्याम आमटे 23 या महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलीनं घरातील हौदात बुडवून मारले , ही घटना बीड शहरातील नरसोबानगर भगत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे
सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते तर पती हा रिक्षा घेऊन बाहेर गेला होता, रात्री घरी आल्यावर राधेश्याम ला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत त्यांनी शोध घेतला मात्र त्या दिसून आल्या नाहीत, अखेर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि घरी आला.
आज सकाळी पाणी घेताना हा प्रकार उघडकीस आला, तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी भेट दिली, निर्दयी मातेला अटक करण्यात आली आहे.