शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: आई सोडून गेली, बापही झाला वैरी; १४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:14 IST

Beed Crime News: चाइल्ड लाइनने केली हेल्प : निर्दयी बाप म्हणाला मुलीला फेकून द्या

बीड : आई गेली आणि दारूच्या व्यसनाने वडिलांना ग्रासले. चौदा वर्षांच्या मुलीच्या नशिबी आलेला वनवास काळज चिरणारा आहे. तिला वडिलांकडून फक्त मारहाण केली जात होती. जेव्हा ‘चाइल्ड लाइन’ मदतीला धावली, तेव्हा त्याच बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे सांगितले. पण, या भीषण परिस्थितीत, ‘चाइल्ड लाइन’ने मदत करत तिला बालगृहाचा आधार दिला.

बीड तालुक्यातील एका कुटुंबात पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक चुलता राहत होते. कोविड काळात दोन्ही मुलींना सोडून त्यांची आई घर सोडून निघून गेली. या घटनेमुळे मुलींचे वडील तणावाखाली आले आणि दारूच्या आहारी गेले. त्यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी मुंबईतील आजीकडे गेली, तर १४ वर्षीय मुलगी वडिलांसोबतच थांबली. पण दारूड्या वडिलांकडून तिला मारहाण होऊ लागली. चुलत्याला बोलता येत नसल्याने, वडील त्यालाही मारहाण करत असे. वडिलांच्या मारहाणीमुळे पीडित मुलगी नातेवाइकांकडे निघून गेली. काही दिवसांनी ती परत आल्यानंतरही तिला पुन्हा मारहाण झाली. हेच चाइल्ड लाइनला समजले आणि त्यांनी तातडीने धाव घेत हेल्प केली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी एफ.एम. शेख आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रकल्प समन्वयक अश्विनी जगताप, सुपरवायझर प्रसाद पवार, स्वप्नील कोकाटे, विजया जाधव आणि पोलिस कर्मचारी रंजना बरडे यांनी ही कारवाई केली.

बाप म्हणतो, मुलीला घेऊन जा अन् तिकडेच फेकून द्याचाइल्ड हेल्प लाइनच्या टीमने बालिकेच्या घरी धाव घेतली. मुलीच्या आजीसह इतरांचे जबाब घेतले. यावेळी बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे बेजबाबदार वक्तव्य केले. हे ऐकून मुलगी घरात असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

चाइल्ड लाइनचा पुढाकार, बालिका बालगृहातचाइल्ड हेल्प लाइनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने १४ वर्षीय पीडित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. बीड जिल्हा बालकल्याण समितीने मुलीची व्यथा समजून घेतली आणि बालगृहामध्ये दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, या बालिकेला बीडमधील एका बालगृहात दाखल करण्यात आले असून, तिचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण