शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:34 IST

नार्को, ब्रेन मॅपिंग अन् १५०० लोकांची चौकशी! महादेव मुंडे प्रकरणाचा सूत्रधार कोण? बीड पोलिसांचा 'हायटेक' तपास

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला दोन वर्षे उलटली तरी मारेकरी अद्याप मोकाट आहेत. मात्र, आता या प्रकरणाचा तपास अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने केलेल्या दोन साक्षीदारांच्या ‘नार्को’ आणि एकाच्या ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून, यामुळे हत्येचे गूढ उकलण्याची शक्यता बळावली आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या अभावामुळे तपासात अडथळे येत होते. त्यामुळे एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला. मुंबईच्या पोलिस रुग्णालयात ही प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात आर्थिक व्यवहार असलेल्यांची, तर दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या साक्षीदारांची चाचणी करण्यात आली. याशिवाय १२ साक्षीदारांची मानसशास्त्रीय तपासणीही पूर्ण झाली आहे.

तपासाचा अवाढव्य आवाकागेल्या सहा महिन्यांत एसआयटीने तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. २०० लोकांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. १५० संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले. १५००हून अधिक लोकांच्या माहितीचे सखोल विश्लेषण केले. तसेच पिग्मी एजंट म्हणून असलेले आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचा वाद की वैयक्तिक वैमनस्य? अशा सर्व बाबींची पडताळणीही करण्यात आली आहे.

गोट्या गिते अद्याप फरारया प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गिते हा अजूनही फरार असून, त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. तो हाती लागल्यानंतर तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सर्वांचे लक्ष अहवालाकडेयापूर्वीच्या तपासातून पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नव्हते. आता प्राप्त झालेले हे वैज्ञानिक अहवाल आयपीएस पंकज कुमावत यांच्या उपस्थितीत उघडले जातील. या अहवालातून हत्येचा नेमका सूत्रधार कोण आणि हत्येचे कारण काय, याचे धागेदोरे मिळतात का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तपासाचे महत्त्वाचे टप्पेचाचण्या : २ नार्को, १ ब्रेन मॅपिंग आणि १२ मानसशास्त्रीय तपासण्या पूर्णअहवाल : शुक्रवारी एसआयटीला प्राप्तस्थिती : मुख्य संशयित गोट्या गिते अद्याप फरार

English
हिंदी सारांश
Web Title : Mahadev Munde Murder: Narco-Brain Mapping Reports Received; Mystery to Unfold!

Web Summary : Two years after Mahadev Munde's murder, narco and brain mapping reports offer new leads. SIT investigation intensifies, focusing on financial dealings and personal disputes. Key suspect Gota Gite remains at large.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी